Vadgaon Maval News : आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता भरत घोजगे यांची निवड

एमपीसी न्यूज : सरपंच व उपसरपंच निवडीसाठी बुधवारी (दि 24) नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्यात  आली. सभेला दहा सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते. आंबी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. 

यामध्ये सरपंच व उपसरपंच पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सरपंचपदी संगीता भरत घोजगे व उपसरपंचपदी सागर देवराम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम टी कारंडे आणि सचिव म्हणून ग्रामसेवक बी जी सुरवसे यांनी कामकाज पाहिले.

यावेळी  नवनिर्वाचित सदस्य प्रदीप दत्तु बनसोडे, सारिका रामनाथ धुमाळ, प्रियंका  नारायण शिंदे, माधुरी अमीर जाधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.