Sangli News: जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सभागृहाला आमदार महेश लांडगे यांचे नाव

एमपीसी न्यूज – सांगली जिल्ह्यातील कवलापूर उशांत क्रीडा व्यायाम मंडळ संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामधील बहुउद्देशीय सभागृहाला आमदार महेश लांडगे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आणि मॅटचे पूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी खासदार संजय पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सुमारे 25 वर्षांपूर्वी आमदार लांडगे कोल्हापूर येथील कसबा-बावडा तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी उत्तमराव पाटील त्यांचे प्रशिक्षक होते. त्याकाळी आमदार लांडगे यांनी जिल्हा, राज्य आणि विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, कालांतराने लांडगे यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, आमदार आणि भाजप शहराध्यक्ष अशी पदे भूषवली. मात्र, गुरू-शिष्यांमधील नाते कायम आहे.

यावेळी प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी केले आणि कुस्ती केंद्राची जडणघडण याची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाच्या वतीने फेटा स्मृतिचिन्ह बुके देऊन मंडळाच्या वतीने पदाधिकारी विश्वस्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

…यासाठी दिले आमदार महेश लांडगेंचे हॉलला नाव!
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती कोच उत्तमराव पाटील म्हणाले की, लांडगे कुटुंबियांनी कुस्ती क्षेत्राला वाहून घेतले आहेत. आमदार लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे यांच्यासोबत मी आखाड्यात खेळलो आहे. त्यांचा मुलगा महेश माझा विद्यार्थी आहे. कसबा- बावडा येथील शासकीय कुस्ती केंद्रात माझ्याकडे महेश यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. लांडगे घराण्याचे कुस्तीचे सेवा केली आहे. 25 वर्षांनंतरही आपल्या गुरूच्या प्रति विनयशीलता, विनम्रता आणि विश्वास जपणाऱ्या महेशचा मला अभिमान वाटतो. महापूराच्या संकटात सांगली आणि कोल्हापूरला तब्बल 63 ट्रक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कोकणातील निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या काळात महेश यांनी 23 ट्रक जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करीत माणुसकी जपली आहे. असे बहुआयामी व्यक्तीमत्व असल्यामुळे आमच्या कुस्ती केंद्रातील हॉलला त्यांचे नाव देण्यात आले आहे, असेही पाटील म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.