Sangvi : तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – दरोड्याच्या गुन्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.

अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव (वय 24, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचे तीन, मारामारीचा एक तसेच सातारा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस चेन स्नॅचिंग व एटीएम चोरीच्या संदर्भात दाखल गुन्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे, पोलीस शिपाई आशिष बनकर यांना माहिती मिळाली की, सांगवी पोलिसांना मागील तीन महिन्यांपासून गुंगारा देणारा आरोपी जुनी सांगवी येथील माकन चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अक्षय याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगवी परिसरात दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. अक्षय याच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात देखील मारामारीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात देखील तो फरार होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सह पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठ बढे, पोलीस कर्मचारी निशांत काळे, आशिष बनकर, प्रवीण माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.