Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली.

शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेला घरगुती किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.