Sangvi Crime News : ऑक्‍सिजन कॉन्सेन्ट्रेटर होलसेल भावात विकण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑक्‍सिजन कॉन्सेन्ट्रेटर व इतर उपकरणे होलसेल भावात देतो, असे सांगत एकाची चार लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 मे 2021 ते 21 जून 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी नितिन भाऊसाहेब चव्हाण (वय 54, रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रजत रबाणी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजत रबाणी याने त्याच्या इ-मेल आयडीवरून फिर्यादी चव्हाण यांना संपर्क साधला. ‘तुम्हाला होलसेल भावात ऑक्‍सिजन कॉन्सेन्ट्रेटर व इतर उपकरणे देतो’, असे सांगून फिर्यादी चव्हाण यांच्याकडून एनईएफटीद्वारे चार लाख सात हजार 998 रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर कोणतेही वैद्यकिय उपकरण न देता तसेच पैसे परत न देता फिर्यादी चव्हाण यांची फसवणूक केली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.