Chinchwad crime News : प्रेम करण्यासाठी नकार देणाऱ्या महिलेला शिवीगाळ; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – ‘माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणाऱ्या तरुणास नकार दिल्याने तरुणाने महिलेला शिव्या दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना चिंचवडमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ मार्च 2019 ते 21 जून 2021या कालावधीत घडली.

अण्णा उर्फ निशांत शंकर साळवे (वय 37, रा. आकुर्डीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. 21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साळवे याने पिडित महिलेला ‘माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी शाररिक संबंध ठेव’, असे मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वारंवार बोलला. तसेच मोबाइलवर वारंवार मेसेज पाठवून पाठलागही केला. फिर्यादी पिडीत महिलेने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे आरोपीने तिला शिव्या देऊन धमकी दिली.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.