Sangvi Crime News : ‘मी इथला भाई आहे’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘मी इथला भाई आहे माझ्याकडे का बघतो’ असे म्हणत तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री शिवाजी चौक, पिंपळे निलख येथे घडली.

सुदर्शन शिवाजीराव कदम (वय 24, रा. रहाटणी. मूळ रा. परभणी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सौरभ मुरकुटे (रा. पिंपळे निलख) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम त्यांच्या मित्राला पिंपळे निलख येथे त्याच्या घरी सोडून दुचाकीवरून जात होते. ते शिवाजी चौकात आल्यानंतर  आरोपींनी फिर्यादी यांना अडवले.

‘का रे माझ्याकडे बघतो. मी इथला भाई आहे. माझ्याकडे का बघतो’ असे म्हणून कोयत्याने फिर्यादी यांच्या दुचाकीवर मारुन दुचाकीचे नुकसान केले. त्यानंतर आरोपी सौरभ याने फिर्यादी यांना कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.