Sangvi : बनावट कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेऊन अडीच लाखांची फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कागदपत्रांच्या छायांकित प्रति आणि बनावट स्वाक्षरीचा वापर करून बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले. त्याद्वारे दोन लाख 54 हजार 857 रुपये क्रेडिट घेऊन मूळ कागदपत्र धारकाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी ते 29 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडला.

यशवंत इंगळे, मिलिंद तेजराव सदनशीव (रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवेक किशनराव खांडरे (वय 35, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून एसबीआय कार्ड येथे फिर्यादी यांच्या नावाचा वापर करून तसेच त्यावर दुस-या व्यक्तीचा फोटो वापरला. क्रेडिट कार्डच्या फॉर्मवर फिर्यादी यांची बनावट सही करून नवीन क्रेडिट कार्ड घेतले. त्या कार्डवरून दोन लाख 54 हजार 857 रुपये क्रेडिट घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.