Sangvi : कर्ज देण्याच्या अमिषाने महिलेची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज देण्याचे अमिष दाखवून महिलेकडून विविध कारणे सांगून तिच्याकडून 2 लाख 44 हजार रुपये घेतले. महिलेचे कर्ज न मिळवून देता तिची फसवणूक केली. ही घटना 16 ऑक्टोबर ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत सांगवी येथे घडली.

ललिता केवल उशीरे (वय 46, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अतुल मौर्य, निकिता जाधव, राजू बर्वे, नितेश कुमार वर्मा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी ललिता यांना बजाज फायनान्सकडून आठ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगितले. हे कर्ज आपल्याला पाहिजे असेल तर प्रोसिजर फी म्हणून 80 हजार रुपये भरण्याची मागणी केली. ललिता यांनी आरोपींनी दिलेल्या बँक अकाउंटवर पैसे भरले. त्यानंतर, आरोपींनी त्यांना कर्ज दिले नाही. त्यामुळे ललिता यांनी भरलेले पैसे परत मागितले.

हे प्रोसिजर फी म्हणून भरलेले पैसे परत मिळविण्यासाठी विविध कारणांनी आरोपींनी पुन्हा पैसे भरण्यास सांगत ललिता यांच्याकडून एकूण 2 लाख 44 हजार रुपये उकळले. त्यानंतर देखील आरोपींनी ललिता यांना कर्ज तसेच भरलेले पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.