Sangvi : भांडणाच्या रागातून महिलेचा विनयभंग; पितापुत्राला अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्राने मिळून महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तानाजी गर्दे, हेमंत गर्दे (दोघे रा. सम्राट कॉलनी, गणेश नगर, पिंपळे निलख) अशी अटक केलेल्या पिता पुत्राची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यामध्ये रस्त्यावरून आणि अन्य काही किरकोळ कारणांवरून भांडण होते. त्या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळे निलख येथे आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. शिवीगाळ करत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.

यावेळी ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी महिलेचे सासू आणि सासरे आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.