Sangvi : साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात

पत्नी, सासरा आणि गर्भपात करणा-या महिला डॉक्टरवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणून तिचा गर्भपात केला. याबाबत जावयाला काहीही सांगितले नाही. याप्रकरणी जावयाने सासरा, पत्नी आणि गर्भपात करणा-या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृणाल धोंडे घोरपडे (वय 33, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासरा सरोजकुमार शंभुदत्त पांडे (रा. नवी सांगवी), पत्नी अन्नपूर्णीमा ऊर्फ बुलबुल मृणाल घोरपडे (रा. नवी सांगवी, सध्या रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) आणि गर्भपात करणारी महिला डॉक्टर (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मृणाल आणि आरोपी अन्नपूर्णीमा हे पती-पत्नी आहेत. अन्नपूर्णीमा सहा महिन्यांची गर्भवती असताना तिचे वडील आरोपी सरोजकुमार यांनी अन्नपूर्णीमा हिच्या आईची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे कारण सांगून अन्नपूर्णीमा हिला आपल्या घरी नेले. त्यानंतर दुस-या दिवशी आरोपी सरोजकुमार याने मूल जन्माला न आणण्यासाठी दबाव आणला आणि डॉक्टर सोबत मिळून अन्नपूर्णीमा हीच साडेसहा महिन्यांचा गर्भपात केला. त्यानंतर अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावली. याबाबतची माहिती फिर्यादी मृणाल यांच्या पासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली.

गर्भपात केल्यानंतर आरोपीने मुलीला मूळ गावी अलाहाबाद येथे नेले. हा प्रकार 28 जानेवारी 2018 ते 9 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. याबाबत मृणाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.