BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने ज्येष्ठाची आत्महत्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पत्नीच्या मृत्यूचे दुखः सहन न झाल्याने ५९ वर्षीय ज्येष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.९) या बाबतची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

  • अनिलकुमार रमणिकलाल दावडा ( सध्या रा. राणूबाई मळा, चाकण, मूळ रा. सराफबाजार राजकोट, गुजरात) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्याचा मुलगा सुमित अनिलकुमार दावडा ( वय ३७) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सुमित दावडा यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, सुमित यांच्या आईचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते. तेंव्हापासून वडील अनिलकुमार दावडा हे मानसिक तणावाखाली होते. त्यातून त्यांनी राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

HB_POST_END_FTR-A4

.