Sangvi News : बांगलादेशी नागरिकाला जुनी सांगवीतून अटक

एमपीसी न्यूज – पासपोर्ट आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ( Sangvi News) एका बांगलादेशी व्यक्तीने भारतात वास्तव्य केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) सायंकाळी जुनी सांगवी येथे करण्यात आली.

 

 

कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय 35, रा. जुनी सांगवी. मूळ रा. रतनपूर, वीरामपुरथाना, जि. दिनाजपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रफुल्ल शेंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Chikhali : फळ विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना अटक

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीपाडा याची पासपोर्ट आणि व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील त्याने भारतात वास्तव्य केले. हा प्रकार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या निदर्शनास ( Sangvi News) आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.