Chikhali : फळ विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज –  फळ विक्रेत्याकडून 21 हजार रुपये खंडणी (Chikhali) घेणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून चिखली येथे घडत होता.

 बाळू उर्फ जयंत नारायण गारुळे (वय 46, रा.चिखली ), संदीप बाबुराव बाबर (वय 28, रा.चिखली), भारत नवनाथ सोनावणे (वय 22, रा.चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकाला आरोपी संगनमताने रोज खंडणी घेत होते. एके दिवशी त्यांनी नकार दिला असता आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देत गल्ल्यातून 200 रूपये काढून घेतले.

असे आत्तापर्यंत 21 हजार रुपये घेतले. अखेर व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी (दि.14)  चिखली भाजी मंडई येथून आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aundh News : पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

यातील बाळू हा सराईत गुन्हेगार असून (Chikhali) त्याच्यावर गंभीर 9 गुन्हे दाखल असून 2000 साली त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

हि कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक दुधावने, अमर राऊत, पोलीस अंमलदार  रमेश गायकवाड आदी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.