Sangvi : चेक कॅन्सल करण्याच्या बहाण्याने वृद्धाची एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मोबाईलवर फोन करून चेक कॅन्सल करून देतो असे म्हणत वृद्धाकडून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे आरोपीने वृद्धाच्या बँक खात्यातून ऑनलाईन माध्यमातून 98 हजार रुपये काढून घेतले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी पावणे दहा ते साडेदहा या कालावधीत घडली.

श्रामदीन रामरत्न वाजपेयी (वय 67, रा. रोझलॅन्ड रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईल नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाजपेयी यांना रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने वाजपेयी यांना त्यांचे बँकेतील चेक कॅन्सल करून देतो असे सांगितले. आरोपीने त्याच्या मोबाईलवरून वाजपेयी यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला. तसेच आरोपीने वाजपेयी यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे त्याने वाजपेयी यांच्या खात्यातून 98 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून काढून घेतले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.