Pimpri News: महापालिका वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याकरिता महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

उपमहापौर  हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. 11 ऑक्टोबर रोजी महापालिका 39  वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

शहरात चार प्रभागांमध्ये इंदौरच्या धर्तीवर कचरा विलगीकरण व संकलन करण्यात येत असून त्याची व्याप्ती शहरात करण्यात येणार आहे.  तसेच वर्धापनदिनिमित्त पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार असणाऱ्या नागरिकांचा गौरव 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.