Satara : भूगोल फाउंडेशनतर्फे अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – भूगोल फाउंडेशन संस्था व क-हा वागज बारामती येथील निवासी मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्यतारा किल्ला, सातारा, भोसरे, अै्ांध संस्थान येथे स्वच्छता जनजागृती तसेच गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण जनजागरण व प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांनी सभाग घेतला.

भूगोल फाउंडेशनचे सदस्य व मूकबधिर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सातारा शहरात पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणारी पत्रके वाटली. त्यानंतर किल्ले परिसरात आलेल्या पर्यटकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. यावेळी पर्यावरण व स्वच्छता या विषयी भूगोल फाउंडेशनचे मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज व निवासी मुकबधिर विद्यालयाच्या संचालिका रामेश्वरीताई जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी वनविभाग, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, अजिंक्यतारा फाउंडेशन, शिवगर्जना अॅकॅडमी, ओंकार एज्युकेशन सोसायटी व मोरांची आई ललिता केशव यांचा ग्रुप या संस्था तसेच संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे साहेबराव गावडे, राजेश किबिले, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, बंडु येरावार, विशाल शेवाळे, सुरेश येरावार, आदेश गरूड, विजय सुतार व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.

गड परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. यावेळी वनविभागाचे भोसले, संदीप गवारे यांचे मार्गदर्शनाखाली गडावर स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत ८ पोती प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गडाचे अात्मवृत्त व प्रदूषण, स्वच्छता सूचना लिहिलेला कायमस्वरूपी फलक लावण्यात आला व त्यानंतर गडावर. देशी,आयुर्वेदिक झाडे लावण्यात आली. त्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी मोरांची आई ललिता केशव यांनी घेतली.

या मोहिमेला विठ्ठल (नाना) वाळूंज, निकुंज रेंगे, सुनील काटकर, बाळासाहेब गरुड, अविनाश खोसे, सुनील बांगर, झारखंडे राय, सुहास चव्हाण ,सत्याकुमार, अमित राय, अरविंद देवकर, सुनील मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.