Loni News : भूगोल फाऊंडेशनच्या वतीने मल्हारी म्हाळसाकांत मंदिर परिसरात स्वच्छता

एमपीसी न्यूज – भूगोल फाऊंडेशनच्या वतीने मल्हारी म्हाळसाकांत मंदिर परिसर, लोणी (आंबेगाव) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ‘जाईल तेथे पर्यावरण स्वच्छता व संवर्धन’ या कृतीयुक्त कार्यक्रमाअंतर्गत या परिसरातील प्लॅस्टिक बॉटल आणि मंदिरा सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. भाऊबीज सणाचे औचित्य साधत शनिवारी (दि.6) हे अभियान पार पडले.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, सेजल वाळुंज, अपूर्वा वाळुंज, सीमा तांबे, मच्छींद्र वाळुंज, राजकिरण वाळुंज, डॉ.अभिषेक वाळुंज, तन्मय तांबे, आराध्या महेंद्र वाळुंज, दुर्वा वाळुंज तसेच, बारकू भोजने व विक्रम भोजने आदी नागरिक या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या उद्देशाने मंदिर परिसराचा सभोवताल स्वच्छ करण्यात आला. आपण आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच वृक्षारोपण देखील केले पाहिजे असा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.