Dagdusheth dutt mandir: दगडूशेठ दत्त मंदिरात वसुबारसेनिमित्त सवत्स धेनू पूजन

एमपीसी न्यूज : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने वसुबारसेनिमित्त गाय वासरू पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टच्या वतीने गाय-वासराच्या तीन जोड्या पूजनासाठी मंदिरात आणण्यात आल्या होत्या. यावेळी महिलांनी गोमातेचे पूजन करुन नैवेद्य दिला.

 

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. दत्तमंदिराच्या स्थापनेचे हे १२५ वे वर्ष आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानले जाते.  असं म्हणतात की, गायीमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. त्यामुळे हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते. वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे गाय-वासरु पूजन आयोजित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.