Pune : एलपीएफ तर्फे 263 मुलींना शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – लीना पूनावाला फाउंडेशन तर्फे (Pune) शहरी तसेच ग्रामीण भागातील सातवी इयत्तेच्या 263 मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. यात विविध प्रकारे मुलींचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.

Pune : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार – मंत्री उदय सामंत

एलपीएफ तर्फे आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यात त्यांना शालेय शुल्कासाठी आर्थिक मदत केली जाणार असून याव्यतिरिक्त लाईफ स्किल ट्रेनिंग, समुपदेशन, एक्सपोजर व्हिजट्स आणि करिअरसाठीचे मार्गदर्शन देखील केले जात आहे. त्यांच्या पुढील शिक्षणासाठीदेखील भविष्यात संस्थेतर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे. पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी देखील लवकरच संस्था शिष्यवृत्ती जाहीर करेल.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कन्नड संघ, पुण्याचे अध्यक्ष कुशल हेगडे आणि सीईएस विलू पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम अहिर यांच्या हस्ते या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

 

कुशल हेगडेंनी आपले विचार मांडताना, “7 इयत्तेत शिकणाऱ्या या मुलींना मदतीचा हात देऊन पुढील 10 वर्षांहून अधिक काळासाठी ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांच्या शिक्षणाचे आणि संगोपनाचे महान कार्य एलपीएफची टीम करत आहे, त्यांच्या या महान पुढाकारामुळे भविष्यात या मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील आणि सोबतच समाजाच्या स्वावलंबी, सुसंस्कृत आणि जबाबदार तरुणी बनतील.” असे मत व्यक्त केले.

 

फिरोज पूनावाला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “गेल्या १३ वर्षांपासून या प्रकल्पाद्वारे आम्ही 2,800 हून अधिक मुलींच्या जीवनात होणारे परिवर्तन पाहिले आहे, एकेकाळी 7 वी इयत्तेत शिकणाऱ्या डोळ्यात खास चमक आणि आशेचा किरण घेऊन येथे आलेल्या या लहान मुलींना आज चमकदार कामगिरी करताना, पाहून आम्हाला खरोखरच खुप अभिमान वाटतो.” असे सांगितले.

 

यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष नरेंद्र पाल सिंग बक्षी, संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला, संस्थापक विश्वस्त फिरोज पूनावाला, संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी रोडा मेहता व संस्थेच्या सीईओ प्रिती खरे यांची उपस्थिती होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.