Vadgaon Maval : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी सुभाषराव जाधव व ज्ञानेश नवले यांची निवड

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी सुभाषराव जाधव व ज्ञानेश नवले यांची मंगळवार (दि 29) रोजी निवड करण्यात आली.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाधव व नवले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नवनियुक्त तज्ञ संचालक सुभाषराव जाधव हे राष्ट्रवादीचे मावळ तालुका ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष तसेच पोटोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तर ज्ञानेश नवले यांनी यापूर्वीही कारखान्याचे तज्ञ संचालक म्हणून काम केले आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, बाळासाहेब विनोदे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, दिनेश मोहिते, प्रवीण काळजे, नरेंद्र ठाकर, ताराबाई सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.दुर्वे, कार्यकारी संचालक एस.जी.पठारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.