Serum Covishield : केंद्रापेक्षा राज्यांना लस महाग ; राज्यांना 400 तर, खासगी हॉस्पिटलला 600 रुपयांना मिळणार लस

एमपीसी न्यूज – केंद्रापेक्षा राज्यांना लसीच्या डोससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत केंद्र सरकारला 150 रुपयांत मिळणारी कोविशिल्ड लस आता राज्यांना 400 रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. तर, खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी सांगिंतलं की, येत्या दोन महिन्यात आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादन क्षमतेच्या एकूण 50 टक्के लसी या भारत सरकारला देण्यात येतील तर 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील.

आतापर्यंत सीरमची कोव्हीशिल्ड ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांना मिळत होती, ती राज्य सरकारांना मात्र 400 रुपयांना एक या प्रकारे खरेदी करावी लागणार आहे. सीरमकडून जी लस तयार केली जाईल त्यापैकी पन्नास टक्के लस केंद्र सरकार आणि उरलेली पन्नास टक्के लस ही राज्य सरकार आणि खाजगी हॉस्पिटल्सकडून केल्या जाणाऱ्या लसीकरणाला पुरवली जाईल,  असंही अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलंय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.