Chikhali News : जीवे मारण्याची धमकी देत नातेवाईकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज  – घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत तरुणाने नातेवाईक महिलेवर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.(Chikhali News) हा प्रकार शनिवारी (दि. १९) दुपारी जाधववाडी चिखली येथे घडला.

याप्रकरणी १९ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीच्या नातेवाईक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती, दीर, सासू हे शनिवारी सकाळी कामावर गेले. त्यानंतर फिर्यादी महिला आणि त्यांची जाऊ अशा दोघी घरी होत्या.(Chikhali News) फिर्यादीची जाऊ देखील बाहेर गेल्यानंतर फिर्यादी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन नातेवाईक तरुणाने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने त्यास विरोध केला असता घडलेला प्रकार कोणास सांगितला तर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.