Bhosari MSEDCL : महावितरणचा सावळा कारभार; तक्रार करूनही अडचण सुटेना

एमपीसी न्यूज – एका ग्राहकाने त्याच्या घरी वीज कनेक्शन (Bhosari MSEDCL) घेतले ते कनेक्शन इतर ठिकाणी वापरले. याबाबत ज्या ठिकाणी कनेक्शन वापरणे सुरु आहे, त्या जागा मालकाने आक्षेप घेऊन महावितरणकडे तक्रार केली. मात्र त्यावर महावितरणकडून कुठलीही कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचे संबंधित जागा मालकाचे म्हणणे आहे.

भोसरी येथील रहिवासी अब्दुलजाहीर पापामिया मुल्ला यांनी महावितरणकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मोठा मुलगा हिदायतखान अब्दुलाजाहेर मुल्ला यांची तक्रारदार यांच्या घरापासून काही अंतरावर जागा आहे. तिथे एक टपरी टाकून त्यांनी वीज कनेक्शन घेतले आहे. मात्र, हिदायतखान हे तिथे राहत नसून तक्रारदार यांच्या मालकीच्या खोलीत राहतात. हिदायतखान यांनी त्यांचे वीज कनेक्शन तक्रारदार यांच्या जागेत वापरणे सुरु केले आहे.

याबाबत तक्रारदार यांनी महावितरणकडे अर्ज केले. तक्रार केली. लघुवाद न्यायालयात देखील तक्रार केली. वर्षभरापेक्षा अधिक कालावधी पासून हा तक्रारींचा पाढा वाचणे सुरु आहे. मात्र, अद्यापही हिदायतखान हे तक्रारदार यांच्या मालकीच्या घरात वापरत असलेल्या वीज कनेक्शनबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Chakan Crime News : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सव्वाचार लाखांची फसवणूक

महावितरणचे (Bhosari MSEDCL) अधिकारी जाणीवपूर्वक या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांच्याकडून वेळ मारून नेण्याचे काम सुरु आहे. कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करत असल्याचे कारण महावितरणचे अधिकारी देत असल्याचे अब्दुलजाहेर मुल्ला यांचे म्हणणे आहे.

याबाबत भोसरी सब डिव्हिजनचे कनिष्ठ अभियंता नंदराग वैरागर म्हणाले, “कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे आम्ही कळवले आहे. तसेच हिदायतखान यांच्या वीज वापराबाबत चौकशी करून त्यांना दुप्पट बिल आकारले जात आहे. वरिष्ठांशी याबाबत पत्रव्यवहार सुरु असून वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.