शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Nigdi News: भाजप, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत; आपचा आरोप

एमपीसी न्यूज – टक्केवारीच्या राजकारणाची राष्ट्रवादीची परंपरा भाजपने (Nigdi News) पुढे सुरू ठेवली. त्यामुळे कमिशन आणि टक्केवारी साठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना कोणतेही निर्धारित मुदतीची बंधने नाहीत. अनेक प्रोजेक्ट  प्रलंबित आहेत. त्याचे खर्च वाढविले जातात. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीच्या  स्वराज्य निर्धार मेळाव्यात करण्यात आला. प्रशासक नेमून महापालिकेची सत्ता चालवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडला सुविधा देण्यापासून कोणी रोखलयं, असा सवालही आपने केला.

आपचा स्वराज्य मेळावा रविवारी निगडीतील पाटीदार भवन येथे पार पडला. आपचे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी-चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, पिंपरी-चिंचवड प्रमुख अनुप शर्मा व इतर अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. या सोबतच शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या वेळी आम आदमी पक्षा मधे प्रवेश केला.

राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात तोफ डागत,स्थानिक तसेच राज्य पातळीवर सरकारच्या अकार्यक्षमतेची जाणीव करून दिली. मुख्य मुद्द्यांना बगल देत धार्मिक तेढ निर्माण करत सामाजिक वातावरण बिघडवून आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न सरकारे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  आप तर्फे केल्या जाणाऱ्याकामांची माहिती देत राज्य आणि देश पातळीवर पक्षाची होत असलेली वाढ सांगत,स्थानिक पातळीवर देखील पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेत घराघरा पर्यंत पोहोचावं असं कार्यकर्त्यांना आवाहन केले.

निवडणुकीच्या निमित्ताने (Nigdi News) विविध आंदोलने व कार्यक्रम हाती घेत, सामान्य जनतेपर्यंत पक्ष आणि त्याचा विचार पोहोचवण्याचा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिला. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत, आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Bhosari MSEDCL : महावितरणचा सावळा कारभार; तक्रार करूनही अडचण सुटेना

नागरिकांच्या कराच्या पैशांतून महापालिकेचा  कारभार चालतो. त्या नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत देणे,हे आमचे परम कर्तव्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात येथील करदात्या सुजाण,सुविद्य तसेच श्रमिक जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी बांधील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टक्केवारीच्या राजकारणावर टीका केली. मात्र, टक्केवारीच्या राजकारणाची परंपरा राष्ट्रवादीची आणि तीच परंपरा भाजपने पुढे सुरू ठेवली. त्यामुळे कमिशन आणि टक्केवारी साठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना कोणतेही निर्धारित मुदतीची बंधने नाहीत,आणि अनेक प्रोजेक्ट  प्रलंबित आहेत.त्याचे खर्च वाढविले जातात.भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत, असा आरोप चेतन बेंद्रे यांनी केला आहे.

सर्वोपचार (Nigdi News) मोफत आरोग्य सेवा,पूर्ण दाबाने चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा,परिपूर्ण सुरक्षित रस्ते,सरकारी घरकुल योजना आणि निवारा हक्क इ मूलभूत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकांची सनद’ आम्ही जनतेसमोर सादर करणार आहोत. शहरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीला येत्या निवडणुकीत विजयी करावे,असे आवाहन कार्यकारी बेंद्रे यांनी केले.

spot_img
Latest news
Related news