Sharad Pawar : कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शरद पवार रवाना

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Sharad Pawar) यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांसह मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात आता प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत.

आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत.

देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, एकच साहेब पवार साहेब, आम्ही पवार (Sharad Pawar) साहेबांसोबत अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.

Pune : पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सुमारे 350 महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.