Pimpri : शरद पवार यांच्या ‘त्या’ विधानाकडे उलट्या अर्थाने बघतो – अजित पवार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षात फुट पडलेली नाही या विधानाकडे मी उलट्या अर्थाने बघतो असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेत आले होते. महापालिका अधिकाऱ्यांसोबत तब्बल तीन तास बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षात फुट पडलेली नाही, अस वक्तव्य केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ‘नो-कॉमेम्ट्स’ म्हणत बोलणे टाळले. पत्रकारांना उलटप्रश्न करत तू कसा बघतोस असे म्हणत मी विधानाच्या उलट बघतो असे अजित पवार म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.