Alandi : शिंदे गट शिवसेनेची आळंदीत एंट्री!

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये शिंदे गट शिवसेनेच्या (Alandi) वतीने नवनियुक्त आळंदी शहर प्रमुख पदी राहुल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आळंदीमध्ये शिंदे गट शिवसेनेची एंट्री झाली आहे. शिंदे यांनी भाजप बरोबर सरकार स्थापन केले. त्यावेळी त्यांच्या बरोबर खासदार, आमदार,पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचा गटात सामील झाले. परंतु, आळंदी येथून त्यावेळी शिंदे शिवसेना गटात कोणीही प्रवेश केलेला नव्हता.

नवनियुक्त आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी निवडी नंतर माऊली मंदिरात जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थान तर्फे व्यवस्थापक माऊली वीर यांनी तसेच माऊली ग्रुप तर्फे व्यापारी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गुळुंजकर यांनी राहुल चव्हाण यांचा सत्कार केला.

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक दिनाचे आयोजन

यावेळी राहुल चव्हाण म्हणाले, आळंदी शहर विकासात सर्वाना बरोबर घेऊन काम केले जाईल. राज्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसह आळंदीतील नागरिकांना नागरी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने दिले जाईल.

यासह पक्ष संघटना अधिक मजबूत करत आळंदी नगरपरिषदेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आणि खेड आळंदी विधानसभेचा आमदार, खासदार शिवसेनेचाच निवडून आणण्यास पक्षादेशा प्रमाणे कामकाज केले जाईल.

लवकरच आळंदीतील विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यास (Alandi) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे माध्यमातून आळंदीत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती आळंदी शहर प्रमुख राहूल चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.