Shirgaon : दारूच्या हातभट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा; एक लाख रुपयांचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज- शिरगाव पोलिसांनी शिरगाव येथील एका शेतात (Shirgaon) छापा मारून दारूभट्टी उध्वस्त केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी दुपारी केली.

याप्रकरणी पोलिसांनी संदीप रमेश सूर्यवंशी (वय 46 रा खळवाडी, मावळ) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल जुंदरे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

Alandi : शेत वाहिवाटीस अडथळा निर्माण करत डॉक्टर व त्यांच्या पत्नीला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी हा शिरगाव येथील आरगडे यांच्या शेताच्या कडेला बेकायदेशीर  देशी दारू तयार करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 500 रुपयांचे दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले.

पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून पसार झाला. शिरगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Shirgaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.