Shirgaon : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकमध्ये चोरी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Shirgaon) रस्त्याच्या बाजूला ट्रक पार्क करून झोपलेल्या चालकाचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) पहाटे दोन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

विशाल भरत वाघमारे (वय 26, रा. वाकड. मूळ रा. बीड) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : राजकीय नात्यावर प्रकाश टाकणारी कविता – ‘ओझे’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक (एम एच 14/एच जी 9666) चालक आहेत. ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात असताना उर्से टोलनाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला ट्रक पार्क करून ट्रक मध्ये झोपले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या केबिनचा डाव्या बाजूचा काच उचकटून केबिनमध्ये प्रवेश केला.

फिर्यादी यांचा आठ हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 18 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत (Shirgaon) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.