Shirur : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला जुन्नरमध्ये झंझावती दौरा

एमपीसी  न्यूज – शिवसेना, भाजप, आर.पी.आय., रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा केला. 

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चिंचोली, पारुंडे, वैष्णवधाम, दातखिळेवाडी, काले, काटेडे, पिंपळागाव, आर्वी, कुरण, वडगाव सहाणी, बस्ती, तेजेवाडी, वाणीमळा, गुंजाळवाडी, वारुळवाडी, नारायणगाव याठिकाणी जनसंपर्क दौरा केला.
प्रत्येक गावात प्रचार रॅलीद्वारे गेल्यानंतर मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.