Pune : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेचे सोमवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने सोमवारी ( दि. 25 नोव्हेंबर) आंदोलन करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची त्वरीत भरपाई मिळावी, म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११:०० वा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून हाॅस्पिटल जवळ येथे शिवसैनिक एकत्र मोठ्या संख्येने जमून, शासकीय कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि शहर समन्वयक आनंद दवे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा पंचनामा त्वरीत करून हेक्टरी रुपये २५,०००/- नुकसान भरपाई त्वरीत मिळावी. विमा कंपन्यांना आदेश देऊन पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरीत वाटप करावी. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस न देण्याच्या सूचना बँक अधिका-यांना द्याव्यात, अशा विविध मागण्या शिवसेनेतर्फे करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like