Nigdi : मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर उषा ढोरे यांनी २४ नोव्हेंबरला निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुमन पवळे, शारदा सोनवणे, माजी नगरसदस्या उमा खापरे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर तुषार हिंगे व नगरसदस्या सुमन पवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.