Chinchwad : हरणे-जिंकणे बाजूला ठेवून खेळाचा मनसोक्त आनंद घ्या- कपिल देव

एमपीसी न्यूज – एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९ नोव्हेंबरपासून सुरु झालेला ‘एल्प्रो स्पोर्ट फेस्टिवल’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आहे. या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारात पुण्यातील अनेक शाळेतील हजारो मुलांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमातील विजेत्यांचा सत्कार भारतीय क्रिकेट टीम चे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते करण्यात आला
आहे.

एल्प्रो स्पोर्ट फेस्टिवलचे उद्दिष्ट खेळाडू वृत्ती, क्रीडा कौशल्य आणि समर्पण याच्यामध्ये सुसूत्रीकरण करणे हा होता. शाळा अंतर्गत व अंतर शालेय अशा दोन विभागांमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला. क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल, श्रो बॉल, टेवल टेनिस, आर्चरी, कॅरम, बुद्धीवळ आणि लाँग जंप या खेळांमध्ये सहभागींची स्पर्धा घेण्यात आली. कपिल देव आणि एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक प्राचार्य डॉ. अमृता वोह्रा यांच्या हस्ते या कार्यक्रमात युवा खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना  कपिलदेव म्हणाले “येथे उपस्थित असलेल्या सर्व युवा खेळाडूंची खिलाडूवृत्ती व खेळाविषयी असलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. माझे हे नेहमीच म्हणणे आहे की कोणताही खेळ म्हणजे फक्त हरणे-जिंकणे इत्तकाच मर्यादित नसतो, खेळातून संघभावना, व्यक्तिमत्व विकास आणि खिलाडूवृत्ती यांचा विकास होतो. त्यामुळे फक्त हरणे-जिंकणे या बाबी बाजूला ठेऊन खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा ”.  या प्रसंगी कपिल देव यांनी एल्प्रो शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. विद्यार्थ्याच्या मनात खेळाविषयी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर कपिलदेव यांनी उत्साहाने दिली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.