IPL 2021: श्रेयस अय्यर आयपीएलमधून बाद, आता दिल्लीचा कॅप्टन अजिंक्य राहणे !

एमपीसी न्यूज : श्रेयस अय्यर हा इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला. त्याच्या खांद्याचे हाड सरकल्यामुळे सध्याच्या मालिकेत खेळू शकणार नाही. याशिवाय ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलमध्येही तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अजिंक्य राहणे कडे दिल्लीच्या संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. 

इंग्लंडच्या डावात आठव्या षटकात श्रेयसने शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेयरेस्टॉने मारलेला फटका रोखण्यासाठी सूर मारला होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर जाताना विव्हळत होता. बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की, ‘श्रेयसला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल. यामुळे तो पूर्ण आयपीएलला मुकेल. नेट्समध्ये परतण्यासाठी त्याला किमान चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्याची दुखापत गंभीर आहे.’ काही दिवसांपूर्वीच इंग्लिश कौंटी संघ लँकशायरने अय्यरला करारबद्ध केले होते. कौंटी क्रिकेट मोसम २३ जुलैपासून सुरु होईल.

श्रेयसच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करण्यास ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ व अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन हे दावेदार मानले जात आहेत. कर्णधारपदासाठी सर्वात चांगला पर्याय अजिंक्य रहाणेचा असेल. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात संधी मिळताच भारताला त्याने ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.