Nigdi News : गाडी खरेदी करा पुढील पाच वर्षे व्यवसाय देतो, असे आमिष दाखवून सहासष्ट जणांची 75 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तुम्ही गाडी खरेदी करा. पुढील पाच वर्ष तुम्हाला व्यवसाय उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवून एका फायनान्स कंपनीच्या मालकाने 66 जणांना गंडा घातला. आरोपीने तब्बल 75 लाखांची फसवणूक केली. ही घटना 15 फेब्रुवारी 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आकुर्डी परिसरात घडली.

श्री साई ग्रुप कार फायनान्सचे मालक अमित निवृत्ती झाडे (वय 35, रा. माळेवाडी, कराड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गजानन भारतराव लासे (वय 36, रा. आळंदी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झाडे याने श्री साई ग्रुप कार फायनान्स कंपनीच्या माध्यमातून गाडी खरेदी करा. तुम्हाला पुढील पाच वर्षांकरिता व्यवसाय उपलब्ध करून देतो. अशी जाहिरात प्रसारित केली. त्या माध्यमातून फिर्यादी यांच्याकडून झाडे याने एक लाख 42 हजार 700 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर झाडे याने फिर्यादी यांना कोणतीही गाडी उपलब्ध करून दिली नाही. तसेच फिर्यादी प्रमाणे अन्य सुमारे 65 जणांकडून सुमारे 75 लाख रुपये घेऊन त्यांना देखील गाडी उपलब्ध करून न देता सर्वांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हीएस धुमाळ तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.