Wakad : ठोक विक्रेत्याची किरकोळ विक्रेत्याकडून साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ठोक विक्रेत्याची किरकोळ विक्रेत्याने ६ लाख ५९ हजार २०९ रुपयांची फसवणूक केली. हा 31 जानेवारी ते 30 एप्रिल 2018 दरम्यान काळेवाडी येथे घडला.

रोहित खुशालराव पुरी (वय 29, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित डेक्कन जिमखाना येथील डी सी सी इलेक्ट्रॉनिक या दुकानात व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून काम करतात. डी सी सी इलेक्ट्रॉनिक हे इलेक्ट्रॉनिक वस्तूची ठोक विक्री करतात. 31 जानेवारी 2018 रोजी आरोपीने हरिओम प्लाझा, नढे नगर काळेवाडी येथे कुलवर्ड रेफ्रिजरेशन (इलेक्ट्रॉनिक्स) हे दुकान चालवीत असल्याचे सांगितले. सुरुवातीला आरोपीने रोहित यांच्याशी रोख आणि चोख व्यवहार केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने रोहित यांच्या दुकानातून 19 एल जी कंपनीचे एसी विकत घेतले. त्याची काही रक्कम रोहित यांना दिली.

मात्र, उर्वरित 6 लाख 59 हजार 209 रुपये न देता दुकान बंद केले. त्यानंतर आरोपीसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच रोहित यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरिक्षक संतोष घोळवे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.