Pune : वेबसाईटच्या माध्यमातून नोकरीच्या आमिषाने युवतीची आर्थिक फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन वेबसाईटचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून युवतीची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना दिल्ली येथून अटक केली आहे. दोघांनी नोकरीच्या आमिषाने युवतीला एकूण 54 हजार 300 एवढी रक्कम भरण्यास भाग पाडून युवतीची फसवणूक केली होती.

पिंटू कुमार यादव (वय 25), सतिश राज यादव (वय 22), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील युवतीने नोकरीसाठी नोकरी डॉट कॉम या नामवंत वेबसाईटवर स्वतःचा बायोडेटा भरुन रजिस्ट्रेशन केले होते. यावरुन तिला चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून एकूण 54 हजार 300 रुपये अकाऊंटवर भरण्यास भाग पाडले. परंतू तिला कोणतीही नोकरी न देता तिची फसवणूक केली अशी तक्रार हडपसर पोलीस स्टेशन येथे दिली होती.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी हे दिल्लीमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार आरोपींचा दिल्ली येथे जाऊन शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 14 मोबाईल, सिम कार्ड्स, 1 लॅपटॉप, इंटरनेट डिव्हाईस, डेबिट कार्ड, पासबुक व रोख रक्कम 40 हजार रुपये जप्त करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस सह आयुक्त बोडखे, पोलीस आयुक्त देशपांडे, आर्थिक व सायबर गुन्ह्याचे पोलीस उप आयुक्त ज्योतिप्रिया सिंह , सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, पोलीस उप निरीक्षक नितीन मस्के व कर्मचारी अजित कुर्हे, नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, अनुप पंडित, शीतल वानखेडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.