Sangakara Supports Ganguly: आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य- कुमार संगकारा

Sourav Ganguly suitable for ICC presidency says Kumar sangakkara याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संचालक ग्रॅम स्मिथने देखील या पदासाठी गांगुलीचे समर्थन केले आहे.

एमपीसी न्यूज – बीसीसीआय अध्यक्ष गांगुली ‘कठोर क्रिकेट मनाचे’ आहेत आणि प्रशासक म्हणून अनुभव त्याला या भूमिकेसाठी एक ‘अतिशय योग्य’ स्पर्धक बनवितो. या माजी भारतीय कर्णधाराची आंतरराष्ट्रीय मानसिकता आहे. जी महत्त्वाची पदे सांभाळताना पक्षपातीपणापासून मुक्त राहण्यासाठी आवश्यक आहे, असे म्हणत श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली यांचे समर्थन केले आहे

सौरव गांगुली बद्दल बोलताना संगकाराने असे म्हटलं आहे की, मला वाटते सौरव गांगुली बदल घडवून आणू शकेल. मी गांगुलीचा एक मोठा चाहता आहे. तो केवळ क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर मला वाटते की त्याच्याकडे कुशाग्र क्रिकेट बुद्धी आहे.

तो क्रिकेटच्या सर्वोत्तम हिताबद्दल सखोल विचार करतो आणि जेव्हा आपण आयसीसीमध्ये असतो तेव्हा ते बदलले जाऊ नये. कारण आपण बीसीसीआय अध्यक्ष किंवा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड किंवा श्रीलंका क्रिकेट किंवा इतर कोणतेही बोर्डचे अध्यक्ष नसतो. तुमची मानसिकता आंतरराष्ट्रीय असली पाहिजे असं संगकाराने म्हटलं आहे.

तो पुढे म्हणाला, बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वीच मी त्याचे काम पाहिले आहे. जगभरातील खेळाडूंशी त्याचे संबंध. एमसीसी क्रिकेट समितीमध्ये त्याचा कार्यकाळ पाहिला आहे. मला वाटतं तो क्रिकेटला व्यवस्थित समजतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो.

संगकारा हा एकमेव माजी आंतरराष्ट्रीय कर्णधार नाही, ज्याने गांगुलीचे समर्थन केले. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संचालक ग्रॅम स्मिथने देखील या पदासाठी गांगुलीचे समर्थन केले आहे. आयसीसी पदाबाबत अजून कोणतीही घाई नाही. तसेच याबाबत अजून काही विचार केला नसल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.