Alandi : दिघी आळंदी वाहतूक विभागाची विशेष कामगिरी;चोरीच्या मोटारसायकलसह चोरास पकडले

एमपीसी न्यूज :  दिघी आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये 2 एप्रिल रोजी डुडुळगांव जकात नाका येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत असताना एक मोटर सायकल चालकाच्या गाडीस पुढील व मागील बाजूस नंबर प्लेट नसल्याने त्यास विचारणा केली (Alandi) असता तो संशियत वाटल्याने ते वाहन दिघी आळंदी वाहतूक विभागात जमा करण्यात आले. त्यानंतर सदर वाहनाचे मूळ मालक नाव व पत्ता काढून माहिती घेतली असता त्या वाहन चोरी बाबतचा  निलंगा पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा नोंद होता.सदर वाहनाची निलंगा पोलीस स्टेशन येथे माहिती कळवण्यात आली आहे.

ती मोटार सायकल चालविणारा व्यक्ती आकाश संजय घाटोळे (वय 24 वर्षे ) रा. ताजणेमळा ,मोर्यानगर,प्रेम रतन सोसायटी जवळ, चऱ्होली फाटा हा उडवा उडवीची उत्तरे देत होता. त्याचा संशय आल्याने हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल बाबत कसून चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे आढळून आले.अधिक कायदेशीर कारवाई करिता मोटारसायकल निलंगा पोलीस ठाणे, लातूर यांच्या ताब्यात दिली आहे.

Chikhali : रात्री उशिरा जेवण न दिल्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार,पो.उपनिरीक्षक राजीव रणदिवे, पोलीस नाईक थोरात,पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड,पो. कॉ. गारोळे, पो. कॉ.डुमनर यांनी दिघी आळंदी वाहतूक विभाग, (Alandi) पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये मोटार सायकल चोरास चोरीच्या मोटारसायकलसह पकडून  विशेष कामगिरी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.