SSC Repeater Exam News : दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी बुधवार (दि. 7) पासून अर्ज करण्याची ( SSC Repeater Exam News) मुदत सुरु होत आहे. ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरता येणार आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा मार्च महिन्यात झाल्या. त्याचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून पुनर्परीक्षा घेतली जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाईन माध्यमातून आवेदनपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Pimpri : मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

माध्यमिक शाळांमार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र पात्र झालेले पण परीक्षा न दिलेले विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार (दि. 7) ते शुक्रवार (दि. 16) या कालावधीत नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर करता येतील. विलंब शुल्कासह 17 जून ते 21 जून या कालावधीत आवेदनपत्रे भरता येतील.

माध्यमिक शाळांना बँकेत चलनाद्वारे शुल्क 8 जून ते 22 जून या कालावधीत भरता येईल. तर माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या 23 जून रोजी जमा करायच्या आहेत.

जुलै-ऑगस्ट मध्ये होणार पुनर्परीक्षा

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. मार्च 2023 मध्ये दहावीची परीक्षा दिलेले व श्रेणीसुधार करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत. आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात ( SSC Repeater Exam News) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.