Nigdi : पर्यावरण रक्षणासाठी कष्टकऱ्यांची सायकल रॅली

एमपीसी न्यूज – पर्यावरणाचा समतोल ढसाळल्याने जग विनाशाच्या (Nigdi) उंबरठ्यावर आहे. तापमान मोठ्या वेगाने वाढत आहे. जमिनीचे भूस्खलन होते आहे आणि अन्न व पाणी विषारी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात असून त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समन्वय समिती यांच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी कामगारांनी निगडी प्राधिकरण येथे सायकल रॅली करून प्रबोधन करण्यात आले. यात बांधकाम कामगार, रिक्षा चालक, फेरीवाला, सफाई कामगार आदी सहभागी झाले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी,राजू बिराजदार, किरण साडेकर, अंबालाल सुखवाल बालाजी लोखंडे, परमेश्वर बिराजदार, राजू खंडागळे, तुकाराम माने, सुषेन खरात, मनोज यादव, हरी भोई, व्यंकट निरगुडे, रहमान चौधरी आदी उपस्थित होते.

SSC Repeater Exam News : दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज करता येणार

यावेळी नखाते म्हणाले, की प्लास्टिक हे अत्यंत भयानक असून दरवर्षी 4 हजार टनाहून (Nigdi) अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते.  त्यातील 50 % सिंगल युज म्हणजे एकदाच वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहे. त्यापैकी केवळ 9% पुनर्वापर केला जातो. प्लास्टिक हे तलाव, नद्या, समुद्रामध्ये फेकले जाते, विषारी धुरात ज्वलन होते.

त्यामुळे ते ग्रहासाठी गंभीर आहे. पाणी आणि अन्न विषारी बनत आहे, रोगराई वाढलेली आहे, प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आहेत म्हणून प्रत्येक नागरिकांनी प्लास्टिक टाळलं तर यावर आपण मात करू शकतो. यासाठी # हॅशटॅग बीट प्लास्टिक पोल्युशन हा उपक्रम जगभरात अवलंबला जात आहे, यात अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.