Talegaon Dabhade : माळवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांना सुरुवात

एमपीसी न्यूज – माळवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन जेष्ठ मान्यवर व महिलांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.यासाठी 4 कोटी 49 लक्ष निधी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, माजी सरपंच सोपान दाभाडे, बबनराव भोंगाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, बबन आल्हाट, नामदेव दाभाडे, चंद्रकांत दाभाडे, जालिंदर गाडे, नवनाथ पडवळ, सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच मनिषा दाभाडे, सदस्य पूनम आल्हाट, पूजा दाभाडे, पल्लवी मराठे, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके म्हणाले की, तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या माळवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे.भविष्यातील गरजा ओळखून अंतर्गत रस्ते व स्वतंत्र पाणी योजनेसह गावाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचा आहे.या योजनेसाठी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुमारे 4 कोटी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे व इतर विकासकामांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे.आगामी काळात देखील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.”

यावेळी माऊली दाभाडे म्हणाले माळवाडी हे विकासाचे मॉडेल म्हणून भविष्यात सर्व परिचित होईल.

माळवाडी गावात वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येत नसल्याने माळवाडी गावासाठी फिल्टर प्लांट व नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीने आमदार सुनिल शेळके यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून माळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 4 कोटी 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.