Alandi : महिलेची आर्थिक फसवणूक करणारा तरूण अटकेत

एमपीसी न्यूज – विश्वासाचा गैरफायदा घेत तरुणाने एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणाला आळंदी पेलिसांनी (Alandi) अटक केली आहे. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

याप्रकरणी संबंधीत महिलेने गुरुवारी (दि.1सप्टेंबर) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय जनार्दन कासतोडे (वय 28 रा.वडगाव रोड, आळंदी) याला अटक केली आहे.

Talegaon Dabhade : माळवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांना सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विश्वास ठेऊन आरोपीला त्यांचा बायोडाटा तयार करण्यासाठी व मोबाईल नंबर बँकेला लिंक करण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर व आधारकार्ड नंबर दिला. याचाच गैरफायदा घेत आरोपीने फिर्य़ादी यांच्या बँक खात्यातून 10 हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. ही बाब लक्षात येताच महिलेने आळंदी पोलीसात धाव घेतली, त्यानुसार पोलिसांनी आरोपीला (Alandi) अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.