Pune crime news : 50 घरफोड्या करत मोक्का मध्ये फरार असणाऱ्या तडीपार सराईताला अटक

एमपीसी न्यूज : एक वर्षापासून मोक्कामध्ये फरार असणाऱ्या तडीपार सराईताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीन यांनी केली आहे.(Pune crime news) आरोपीवर  पुणे व नाशिक परिसरात मिळून 50 घऱफोडीचे गुन्हे असल्याचे समोर आले आहे.

गोरखसिंग गागासिंग टाक (वय 35 रा.हडपसर) असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला 24 ऑगस्ट रोजी  अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना शिवणे येथे फरार आरोपी असल्याची पोलिसांना खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टाक याला अटक केली.(Pune crime news) त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने पुण्यात घरफोडीत चोरलेले दागिने त्याने नाशिक येथील सोनार कैलास रामनाथ (वय55 रा. पंचवटी) याला विकल्याचे कबुल केले.पोलिसांनी सोनाराला अटक करून त्याच्याकडील 6 तोळे वजनाचे 3 लाख रुपयांचे दागिने जप्त केले. गोरखसिंग टाक याने त्याचे दोन साथीदारांसह ही घरफोडी केल्याचे कबुल केले. टाक याच्यावर उत्तमनगर पोलीस ठाणे येथील एक, वानवडी पोलीस ठाण्यातील 2 असे 3 गुन्हे उघडकीस आले.

Talegaon Dabhade : माळवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांना सुरुवात

तसेच पोलीस तपासात टाक याला 6 एप्रिल 2021 मध्ये हडपसर पोलिसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केल्याचेही समोर आले. तसेच कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावून त्याला फरार घोषीत केले होते. टाक याच्यावर आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो सध्या नाशिक येथे वास्तव्यास होता.(Pune crime news) तडीपारीच्या काळात त्याने नाशिक येथेही सात घरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. याचा पुढील तपास गुन्हे शाखा तीनचे पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे ,पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील, पोलीस अमंलदार संतोष क्षिरसागर, रांजेद्र मारणे, रामदास गोणते,(Pune crime news) शरद वाकसे, किरणपवार, सुजित पवार, संजिव कळंबे, प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, गणेश शिंदे,साईनाथ पाटील,सतिश कत्रांळे, प्रताप पडवळ, राकेश टेकावडे, ,सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.