Maharashtra News : ग्रामीण भागातील शाळा सुरू 

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या भीतीमुळे लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आजपासून (सोमवार, २३ नोव्हेंबर) पासून बर्‍याच ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या जात असून त्यासाठी खूप तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि ठाणे येथे कोरोना संसर्ग लक्षात घेता ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर रोजी सांगितले की २३ नोव्हेंबरपासून ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा खुल्या करण्याची योजना आहे. मात्र मुंबईतील कोविड -१९ चा वाढता प्रसार लक्षात घेता शुक्रवारी शहरातील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

 

यापूर्वी पुणे व ठाणे महानगरपालिकांनीही कोविड -१९ च्या वाढत्या प्रकरणांना ध्यानात घेऊन शहरी भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.