Pune News: पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या दोघा तरुणांना अटक

एमपीसी न्यूज:  पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल सव्वासहा किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. कल्याण संभाजी बिडगर (वय 25) आणि शुभम संजय सोनवले (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक अमोल पवार यांना दोन तरुण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एके ठिकाणी दुचाकीवर थांबलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याजवळ असलेल्या पांढऱ्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल सव्वा सहा किलो गांजा आढळला. पोलिसांनी या तरुणाना अटक केली असून गांजा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.