Pimpri : कोरोनाच्या अधिकृत माहितीसाठी राज्य शासनाचा ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ ग्रुप

एमपीसी न्यूज – कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +912026127394 या क्रमांकाचा ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ ग्रुप सुरु केला आहे. याच्या माध्यमातून जनतेला कोरोना विषयी अधिकृत माहिती घेता येणार आहे. सध्या इंग्रजी भाषेत देण्यात येणारी हि माहिती नंतर मराठी व इतर भाषांतही मिळेल व त्यावर काम सुरू आहे. प्रसाशन तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे त्यामुळे नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आपण सर्वांनी त्याला सहकार्य करावे. तसेच राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधींचा पुरेसा साठा असून नागरिकांनी दुकानामध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी मंगळवारी रात्री 12 नंतर संपूर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली. यानंतर लगेचच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान यांच्या बरोबर माझे बोलणे झाले असून आपण अगोदरच महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे. असे असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधे, दुध, भाजीपाला यांचा राज्यातील जनतेला व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने-आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.