Bhosari : सुरक्षा रक्षक कार्यालयातील संगणक चोरीला

एमपीसी न्यूज – ऑफिसमधून संगणक संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी अडीच ते बुधवारी (दि. 31) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कासारवाडी येथे घडली.

विजय लक्ष्मण वानखेडे (वय 39, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथे शुभम एच पी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रा. लि. ही सुरक्षा रक्षक पुरवठा करणारी कंपनी आहे. अज्ञात चोरट्यांनी इमारतीच्या टेरेसचा दरवाजा तोडून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात असलेला 32 हजार रुपये किमतीचा संगणक सीपीयू, की बोर्डसहित मंगळवारी दुपारी अडीच ते बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.