Uma Khapre : कुवेतमध्ये अडकलेला विद्यार्थी सुखरुप परतला; आमदार उमा खापरे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – मागील दोन महिन्यांपासून कुवेत (दुबई) येथे अडकलेला आणि संकटात सापडलेला एक विद्यार्थी आज (शुक्रवारी) मायदेशी सुखरुप (Uma Khapre) परतला. या विद्यार्थ्याला सोडविण्यासाठी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका झाली.

सागर सुभाष संकपाळ (वय 28, रा.कराड, सातारा) असे सुखरुप परतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सागर हा त्याच्या कामासाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी कुवेत येथे गेला होता. कुवेतला पोहचल्यानंतर त्याची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे त्याने भारतात परतण्यासाठी तेथून सोडण्याची याचना तेथील कर्मचार्‍यांकडे केली. मात्र, कर्मचार्‍याने सागरचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन जप्त केला. त्याच्यावर शारिरीक अत्याचार केले. त्याशिवाय त्याला राहत्या खोलीतून हाकलून दिले. यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ बिघडले होते.

FDA action : पुणे शहरात प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात आणखी दोन ठिकाणी कारवाई

सागर कुवेत येथे अडकल्याची आणि त्याला त्रास दिला जात असल्याची माहिती आमदार उमा खापरे यांना समजली. त्यांनी कोणताही विलंब न करता (Uma Khapre) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. सागरला सोडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. त्याबाबत वेळोवेळी संपर्कात राहिल्या. पाठपुरावा केला. अखेरीस त्यांच्या पत्राची परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेतली आणि सागरची भारतात परतण्याची व्यवस्था केली. सागर आज मायदेशी सुखरुप परतला. त्याने आमदार खापरे यांच्या चिंचवड येथील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेत आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.